Pune News : ‘ड्रेनेजचे 392 कोटींचे काम विशिष्ट ठेकेदारालाच देण्याचा घाट’

निविदा रद्द करण्याची आमदार सुनिल टिंगरे यांची मागणी

0

एमपीसीन्यूज : पुणे महापालिकेतील 11 गावांमधील ड्रेनेज व मलनि:स्सारण प्रकल्पांच्या 392 कोटींचे काम विशिष्ट ठेकेदारच पात्र ठरतील अशा पध्दतीचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करून झोननुसार किंवा चार ते सहा वेगवेगळ्या पॅकेजमध्ये काढण्यात यावी, अशी मागणी आमदार सुनिल टिंगरे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

आमदार टिंगरे यांनी याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, समाविष्ट 11 गावांमधील ड्रेनेज व मलनि:स्सारणच्या कामांची 392 कोटींची निविदा प्रशासनाने काढली आहे. या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने या निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, या निविदाने प्रक्रियेने संशय निर्माण करणारे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुळातच 11 गावे ही शहरांच्या वेगवेगळ्या भागातील आहे. त्यानुसार या कामांसाठी झोननुसार किंवा चार ते सहा स्वतंत्र निविदा काढणे शक्य होते. त्यामुळे निविदांसाठी अधिकाधिक ठेकेदारपात्र होऊन निकोप स्पर्धा होऊ शकेल.

तसेच ही कामे गुणव्वतापूर्ण व वेळेत पूर्ण होतील. मात्र, असे असताना एकच निविदा ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर काढली असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच या प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराविषयी अनेक तक्रारी आहेत. त्यावर कारवाईचा प्रस्तावही प्रशासनाने ठेवला होता. त्यात या कामांची निविदा 8 ते 10 टक्के इतक्या वाढीव दराने येणार असल्याची चर्चा निविदा उघडण्याआधीच सुरू आहे.

या निविदांमध्ये रिंग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी. आणि झोननुसार अथवा चार अथवा सहा वेगवेगळ्या निविदा काढण्यात याव्यात अशी मागणी आमदार टिंगरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment