Pune news : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराचा 39 वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज़- श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराचा आज 39वा वर्धापन दिन (Pune news ) साजरा झाला. ह्याला परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल उपस्थित होते. त्यानंच्या हस्ते गुढीपूजन करुन गणरायाची आरती करण्यात आली. कार्यक्रमात बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि साखरेच्या गाठींच्या आकाराची फुलांची आकर्षक आरास केली होती.

 

 

पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त कुमार वांबुरे, अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, विलास रासकर आदी उपस्थित होते.

 

 

Tathawade News – ताथवडेच्या जीएसपीएम कॉलेजमध्ये उद्या इनोव्हिजनचे उदघाटन

 

संदीप सिंह गिल्ल म्हणाले, नवीन वर्ष सुख, शांती व आनंदाचे जावो, यासाठी आपण गणरायाचरणी नतमस्तक होत आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिराचा देखील वर्धापनदिन आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सातत्यानेसुरु आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मानवसेवेचा वसा असाच पुढे सुरु राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

माणिक चव्हाण म्हणाले, गणपती मंदिराच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान म्हणजेच दि. 22 ते 30 मार्चपर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया (Pune news ) संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.