Pune News : पुण्यातील 40-50 लहान रुग्णालयांनी ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांना दाखल करून घेणे थांबविले

एमपीसी न्यूज – पुण्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा (oxygen shortage in pune) जाणवू लागला आहे. आता शहरातील 40-50 लहान रुग्णालयांनी ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांना दाखल करून घेणे थांबविले आहे.

पुणे शहरात ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णालयांवर कोरोना रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची वेळ आली होती.पण अडचण असतानाही ऑक्सिजन मिळत नसल्याने आता शहरातील लहान रुग्णालयांनी कोरोनाचे रुग्ण दाखल करून घेणे थांबविले आहे. या रुग्णांना दुसऱ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे. पुणे शहरातल्या 120 पैकी 40-50 रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती आहे.

पुण्यातील हॉस्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाचे चेअरमन डॉ. संजय पाटील म्हणाले की, ऑक्सिजन अभावी रुग्ण मॅनेज करायला अडचण येत आहे. जर हॉस्पिटलमधून रुग्णाला शिफ्ट करायची वेळ आली तर नातेवाईकांकडून तोडफोड करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या छोट्या रुग्णालयांनी रुग्णांना भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आहे. प्रशासनाने लवकरच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.