Pune News : जिल्ह्यात 1 कोटी 10 लाख लोकांच्या सर्वेक्षणसाठी 4,905 पथकांची नेमणूक

मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आजार, लठ्ठपणा, दमा असलेल्या व्यक्ती ओळखून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे 24 लाख 50 हजार कुटुंब व 1 कोटी 10 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 4,905 पथके नेमण्यात आली असून, सुमारे 15 हजार कर्मचारी आणि स्वयंसेवक असतील, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्हर्चुअल पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटिंग या त्रिसूत्रीचा वापर करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात येतील. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आजार, लठ्ठपणा, दमा असलेल्या व्यक्ती ओळखून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. हे अभियान येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. या सर्वेक्षणामध्ये चाचणीचे प्रमाण देखील वाढणार असून बाधित सापडलेल्या रुग्णांचे त्वरित उपचार करण्यावर भर दिला जाणार आहे. बेड क्षमता वाढविण्याबाबत खासगी रुग्णालयांना चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.