Pune News : मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे 5 कोविड केअर सेंटर सुरु होण्याच्या प्रतीक्षेत

एमपीसी न्यूज – महापालिकेने पाच ठिकाणी काेविड केअर सेंटर (सीसीसी) सुरु करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, याठिकाणी तैनात करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसस्याने हे सेंटर केव्हा सुरु होणार याबाबत अनिश्चितता आहे.

शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापािलकेने सध्या चार ठिकाणी काेविड केअर सेंटर सुरु केली आहेत. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या 1 हजार 250 बेडची व्यवस्था केली आहे. याशिवाय कृषी महाविद्यालय वसतिगृह (750 बेड), बालेवाडी क्रीडा संकुल (350 बेड), एस.एन.डी.टी. महाविद्यालय (300 बेड), आंबेडकर वसतिगृह – मुलांचे (300), आंबेडकर वसतिगृह – मुलींचे (200) अशी पाच काेविड केअर सेंटर सज्ज ठेवली आहेत.

या पाच काेविड केअर सेंटरमध्ये एकूण 1 हजार 900 रुग्णांची व्यवस्था केली जाऊ शकते. यासंदर्भात मालमत्ता विभागाने आराेग्य विभागाला पत्र पाठविले आहे. या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यानंतर ते सुरू करता येतील. असे पत्रात म्हटले आहे. मात्र अद्याप मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने ही‌ सेंटर केव्हा होतील याबाबत अनिश्चितता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.