Pune News : भाजप नगरसेवकांना 5 कोटी तर, विरोधी पक्षाच्या नेत्यांना 2 ते अडीच कोटी निधी

एमपीसी न्यूज – येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांना झुकते माफ देण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना 5 कोटी तर, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना 2 ते अडीच कोटी निधी देण्यात आला आहे. स यादीतून हे बजेट दिले जाते.

या यादीवर सातत्याने टीका होत आहे. तेच ते रस्ते, ड्रेनेज, डांबरीकरण, काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे ही पुणेकरांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप आहे. कोरोनाचा वर्षभर परिणाम झाला आहे.

2022 मध्ये मनपा निवडणूक आहे. त्यापूर्वी वॉर्ड रचना होणार आहे. सर्वच नगरसेवकांना जनसंपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. या आजारामुळे सांस्कृतिक कार्यक्रमही बंद आहेत. 2017 ची निवडणूक ही 4 च्या प्रभाग पद्धतीने झाली. त्याचा भाजपला फायदा झाला. तब्बल 100 नगरसेवक निवडून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.