Pune Division Corona Update : पुणे विभागातील 5 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 94.28 टक्के

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 34 हजार 907 झाली आहे. विभागातील 5 लाख 04 हजार 316 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागातील ॲक्टीव रुग्णांची संख्या 15 हजार 609 एवढी आहे. विभागात 14 हजार 982 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के इतके आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.28 टक्के आहे.

पुणे विभागात आज 1 हजार 125 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 830, सातारा जिल्ह्यात 135, सोलापूर जिल्ह्यात 118, सांगली जिल्ह्यात 23, कोल्हापूर जिल्ह्यात 19 रुग्णांची वाढ झाली आहे. विभागात रविवारी (दि.29) रोजी बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 930 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 622, सातारा जिल्ह्यामध्ये 88, सोलापूर जिल्ह्यामध्ये 172, सांगली जिल्ह्यामध्ये 31 व कोल्हापूर जिल्ह्यातील 17 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 42 हजार 370 झाली आहे. 3 लाख 22 हजार 477 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 595 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकुण 8 हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे. पुणे जिल्हियामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.19 टक्के आहे.

आजपर्यंत पुणे विभागात एकूण 28 लाख 55 हजार 725 नमून्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 5 लाख 34 हजार 907 नमूने सकारात्मक आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.