Pune News: पीएमसी केअरला वर्षभरात 50 हजार तक्रारी

एमपीसी  न्यूज –  महापालिकेच्या पी.एम.सी. केअर तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर मागील आर्थिक वर्षात 50 हजार 135 तक्रारी आल्या असून त्यातील 44 हजार 394 तक्रारी निरस्त केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

 

शहरातील नागरिकांना भेडसावणार्‍या विविध तक्रारींची व समस्यांची ऑनलाईन तक्रार करण्यासाठी महापालिकेने पी.एम.सी. केअर ही तक्रार निवारण यंत्रणा उभी केली आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षात सर्व विभागांच्या मिळून एकूण 50 हजार 135 इतक्या तक्रारी आल्या आहेत. यातील 44 हजार 394 इतक्या तक्रारी निरस्त करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेशी संबंधित नसलेल्या 3 हजार 922 तक्रारी नाकारल्या असून एकूण 1 हजार 819 तक्रारी प्रलंबित असल्याचे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. कुनाल खेमणार यांनी सांगितले आहे.

 

मार्च 2022 मध्ये एकूण 6 हजार 31 इतक्या तक्रारी प्राप्त झाल्या असून एकूण 4 हजार 816 तक्रारी निरस्त करण्यात आल्या असून रोज सरासरी 155 इतक्या तक्रारी निरस्त करण्यात आल्या आहेत. निराकरण केलेल्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने घनकचरा, पाणीपुरवठा, अतिक्रमण, पथ, विद्युत विभागांच्या असल्याचेही खेमणार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.