_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : कोरोनाच्या पहिल्या लाटेत 51 तर दुसऱ्या लाटेत 20 पालिका कर्मचाऱ्यांनी गमावला कोरोनामुळे जीव

0

एमपीसी न्यूज – महापालिका कर्मचारी जीवाची परवा न करता सातत्याने कोरोना काळात काम करत आहेत. त्यामध्ये कचरा वेचकांपासून ते मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे हे कर्मचारी कोरोनाला बळी पडत आहेत. आता पर्यंत पहिल्या लाटेत 51 जणांचा, तर दुसऱ्या लाटेत 20 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणेकरांना कोरोनापासून वाचविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य, अग्निशमन दल, सफाई खाते, अभियंता खाते आदी विभागांचे अधिकारी, अभियंते, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त , सफाई कर्मचारी, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, प्रत्येक वार्डात सहाय्यक आयुक्त, त्यांचे वरिष्ठ उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि स्वतः आयुक्त हे रात्रंदिवस विविध प्रकारे उपाययोजना करीत आहेत. मात्र या जीवघेण्या कोरोना विरोधात लढा देत असताना पालिकेच्या योद्धांनाच म्हणजे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, सफाई कर्मचारी आदींना आपला जीव गमावला लागला आहे.‌ कोरोनाशी मुकाबला करताना आतापर्यंत महापालिकेच्या एकूण 71 कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमवले आहेत. सर्वाधिक 21 सफाई कर्मचारी आणि 13 बिगारी कामगार करोनाचे बळी ठरले आहेत.

कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये करोनाने मृत्यू पावलेल्या एकूण 71 कर्मचाऱ्यांमध्ये 64 कायम कर्मचारी, तर सात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या लाटेत बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जयंत सरवदे यांचा; तर दुसऱ्या लाटेत सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे या प्रथम वर्ग अधिकाऱ्यांचे कोरोनाने निधन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment