Pune News : पीएम केअर फंडातून पुणे शहराला मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे येथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र दिसत आहे. शहरात आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच आता कोरोनाच्या काळात पीएम केअर फंडातून पुणे शहराला मिळालेले तब्बल 58 व्हेंटिलेटर खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या ससून रुग्णालयातील हे व्हेंटिलेटर आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत यांच्या झालेल्या बैठकीत ससून रुग्णालयाच्या डीनने ही बाब निदर्शनास आणून दिली.

पुणे शहरात सुरुवातीपासूनच व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे केंद्र सरकार कडून पुण्याला पुन्हा एकदा 165 व्हेंटिलेटर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे व्हेंटिलेटर येईपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा वाट पहावी लागणार आहे. परंतु याआधी पीएम केअर फंडातून मिळालेले तब्बल 58 व्हेंटिलेटर खराब झाल्यामुळे ससून रुग्णालयातील स्थिती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.