-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : दसऱ्याच्या मुहूर्तावर पुणे आरटीओत तब्बल 6455 वाहनांची नोंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला नागरिकांनी याही वर्षी प्राधान्य दिले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याबाबतची माहिती दिली असून मागील आठ दिवसात तब्बल 6455 वाहनांची नागरिकांनी खरेदी केल्याची नोंद केली आहे.

या वाहन खरेदीतून आरटीओ कार्यालयास कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सणाच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांनी मागील आठ दिवसात 3751 दुचाकी खरेदी केल्या आहेत. तर 2339 मोटर कार खरेदी केल्या आहेत. 197 व्यावसायिक वाहने खरेदी केल्याची नोंद करण्यात आली आहे. अशी एकूण 6455 वाहनांची नागरिकांनी खरेदी केली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

मागील वर्षी दसऱ्यानिमित्त नागरिकांनी 7822 वाहने खरेदी केली होती. यामध्ये 4 हजार 966 दुचाकींची ग्राहकांनी खरेदी केली होती. यावर्षी यामध्ये घट झाली आहे.. एकूण 3 हजार 751 दुचाकींची खरेदी करण्यात आली. त्याचबरोबर गेल्यावर्षी 2 हजार चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली. यावर्षी यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन सुमारे 2 हजार 339 चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली.

गेल्यावर्षी फक्त 321 रिक्षांची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी यामध्ये घट होऊन 43 रिक्षांची खरेदी करण्यात आली. मालवाहू वाहनांच्या खरेदीमध्ये यावर्षी घट दर्शविण्यात आली. गेल्यावर्षी 254 मालवाहू वाहने खरेदी करण्यात आली होती. यावर्षी 197 मालवाहू वाहनांची खरेदी करण्यात आली.

दसऱ्यानिमित्त अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांसाठी विशेष ऑफर दिल्या होत्या. कमी डाऊन पेमेंट, नोंदणी आणि विम्यातील सवलत यामुळे ग्राहकांचा कल यावर्षी वाहन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून आला. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.