Pune News: पुण्यातील सराईत गुन्हेगारांवर 64 वा मोक्का; पोलिस आयुक्तांची धडाकेबाज कारवाई

एमपीसी न्यूज: पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार वृषभ उर्फ गुड्या युवराज आल्हाट आणि त्याच्या टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. सतत गुन्हेगारी कृत्य करून परिसरात आपली दहशत निर्माण केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पुणे शहरात दहशत माजवत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर वचक राहावा यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील काही दिवसांपासून मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत 64 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे.

वृषभ उर्फ गुड्या युवराज आल्हाट (वय 24), शंभू बालाजी कावळे (वय 22), करण भाऊसाहेब राखपसरे (वय 22) अशी मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी स्वतःच्या टोळीचे वर्चस्व ठेवण्यासाठी विमानतळ, येरवडा व चंदननगर परिसरात दहशत पसरली होती. त्यांनी आजवर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, बेकायदेशीररित्या घातक शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.

या सर्व आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. अशातच विमानतळ पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध आणखी एक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यामार्फत या आरोपींवर मोका कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.