Pune News : पुण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 67 टक्के पुरूष तर 33 टक्के महिलांचा समावेश

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाने मृत्यूमुखी पडण्यात पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरातील कोरोनामृतांच्या संख्येत तब्बल 67 टक्के पुरूष आहेत. तर 33 टक्के महिलांचा समावेश आहे. 20 एप्रिलपर्यंत एकूण 6 हजार 218 जणांचा मृत्यू झाला आहे.

कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडणाऱ्या पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याने पुरुष जास्त बाधित होत आहेत. गेल्या वर्षभरातील कोरोनामृतांच्या संख्येत तब्बल 67 टक्के पुरूष आहेत. तर 33 टक्के महिलांचा समावेश आहे. यात 4 हजार 137 पुरुष, तर 2081 महिलांसह 1 तृतीयपंथीयाचा समावेश आहे.

20 एप्रिल 2021 अखेरपर्यंत करोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय-4, 163 जणांचा समावेश असून यात 2792 पुरूष तर 1371 महिलांचा समावेश आहे. 40 ते 60 – 1,735 जणांचा मृत्यू झाला असून, यात 1,125 पुरूष तर 609 महिलांचा समावेश आहे. तर 20 ते 40 वयोगटातील 302 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 212 पुरूष तर 90 महिला आहेत. तर 20 पेक्षा कमी वयांच्या मृतांमध्ये 8 मुले तर 10 मुलींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.