Pune News : 14 मिनिटांत 7 लाखांचा चुराडा ; ऑनलाईन जीबी तहकूब !

एमपीसी न्यूज : राज्य सरकारने ऑफलाईन म्हणजे थेट सभागृहात मुख्य सर्वसाधारण सभा (जीबी) 200 पटसंख्येच्या अटीशर्तींसह घेण्याचे लेखी आदेश रविवारी (दि.7 फेब्रुवारी) दिले होते. तरीही राजकीय आकसापोटी विरोधकांच्या विरोधाला न जुमानता सत्ताधारी भाजपने ऑनलाईन जीबी घेतली परंतु अवघ्या 14 मिनिटांत तहकूब केली. या अट्टाहासामुळे ऑनलाईन यंत्रणेसाठी इंटरनेट, व्हिडीओ कॉन्फरसिंग कॅमेरे, डिजीटल डिस्प्ले वॉल, एलईडी टिव्हीसाठी 7 लाख रुपयांचा चुराडा झाला.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या 8 महिन्यांपासून पुणे महापालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा झाली नव्हती. प्रत्येक 15 क्षेत्रिय कार्यालयांमध्ये इंटरनेट, व्हिडीओ कॉन्फरसिंग कॅमेरे, 4 डिजीटल डिस्प्ले वॉल आणि मोठे 30 हून जास्त नवीन एलईडी टिव्ही, स्टॅन्ड बसविण्यात आले आहेत.

तर महापालिकेत पदाधिकारी आणि महापौर कार्यालयामध्ये ऑनलाईन सभेची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्यानुसार क्षेत्रिय कार्यालयांमध्ये नगरसेवकांचे नियोजन क्षेत्रिय आयुक्तांकडे देण्यात आले आहे. ऑनलाईन सभेमध्ये मतदानाचीव्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन सर्वसाधारण सभा झाली. सत्ताधाऱ्यांच्या दुराग्रहामुळे ‘औट घटकेच्या’ जीबीसाठी जनतेच्या कररुपी लाखो रुपयांचा अक्षरश: चुराडा झाला हे दुर्दैवी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.