Pune News: बाजारात आज 90 ते 100 गाड्या भाजीपाल्याची आवक

कोथिंबिरीची सुमारे एक लाख व मेथीची 60 हजार जुडींची आवक झाली.

एमपीसी न्यूज – मार्केटयार्डमध्ये रविवारी 90 ते 100 गाड्यांची आवक झाली. कर्नाटक येथून तीन ट्रक मटार, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात व कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक येथून 3 टेम्पो घेवडा, इंदूर येथून 9 ते 10 टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश व गुजरात येथून लसणाची 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले 1100 पोती, टॉमेटो दोन ते अडीच हजार पेटी, हिरवी मिरची 3ते 4 टेम्पो, भेंडी 10 ते 12 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, भुईमूग 125 ते 150 पोती, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळाची 7 ते 8 टेम्पो, कांदा 25 ट्रक, आग्रा व इंदूर येथून प्रत्येकी 20 ते 22 टेम्पो बटाट्याची आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे दर : कांदा : 70-100, बटाटा : २30-270, लसूण : 700-1100, आले : 200-400, भेंडी : 100-160, गवार : 250-350, टोमॅटो : 100-160, दोडका : 180-220, हिरवी मिरची : 250-300, दुधी भोपळा : 100-150, चवळी : 100-150, काकडी : 60-100, कारली : हिरवी 150-200, पांढरी 100-120, पापडी : 140-150, पडवळ : 150-200, फ्लॉवर : 100-160, कोबी : 50-80, वांगी : २00-300, डिंगरी : 150-160, नवलकोल : ८8-100, ढोबळी मिरची : 250-300, तोंडली : कळी 200-250, जाड : 130-140, शेवगा : 400-500, गाजर : 160-200, वालवर : 250-300, बीट : 60-100, घेवडा : 200-300, कोहळा : 100-120, आर्वी : 150-200, घोसावळे : 140-150, ढेमसे : 180-200, पावटा : 250-300, भुईमूग शेंग : 300-350, मटार : परराज्य 600-750, 700-850, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, मका कणीस : 50-80, नारळ (शेकडा) : 1000-1600.

कोथिंबिरीची सुमारे एक लाख व मेथीची 60 हजार जुडींची आवक झाली.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 1000-2000, मेथी : 800-1400, शेपू : 300-600, कांदापात : 1000-1400, चाकवत : 500-600, करडई : 500-600, पुदिना : 300-400, अंबाडी : 500-700, मुळे : 1000-1500, राजगिरा : 500-600, चुका : 500-700, चवळई : 600-700, पालक : 600-800.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.