Pune News : डेटिंग सर्विस देण्याच्या आमिषाने 78 वर्षीय वृद्धाची 1 कोटी रुपयांना फसवणूक

एमपीसी न्यूज- डेटिंग सर्विसचे अमिष एका 78 वर्षीय वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. या वृद्ध नागरिकाची जवळपास एक कोटी दोन लाख रुपयांनी फसवणूक ( Pune News ) करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृद्धाने तक्रार दिली आहे.

Crime News : किरकोळ कारणावरून एकाला टोळक्याकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, के बी टेलीकॉम या कंपनीतील रजत सिन्हा आणि नेहा शर्मा यांनी वारंवार फिर्यादी यांना फोन करून डेटिंग सर्विस देण्याच्या नावाखाली वेगवेगळे कारणे सांगून त्यांच्याकडून तब्बल वेगवेगळ्या बँक खात्यात एक कोटी दोन लाख 12 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. आणि त्यानंतर कोणतीही सर्विस न देता आणि पैसे रिफंड न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला ( Pune News ) असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.