Pune News : क्रेडीट कार्डच्या नावाखाली साडे तीन लाखांचा गंडा, पोलिसांच्या तत्परतेमुळे पैसे मिळाले परत

एमपीसी न्यूज – नविन एसबीआय क्रेडीट कार्ड देण्याचे आश्वासन देऊन एका इसमाला तीन लाख 66 हजार रुपयांचा गंडा घातला. मात्र, सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे फिर्यादीला रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इसमाला 14 जुलै रोजी मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करुन चालू एसबीआय क्रेडीट कार्ड बंद करून नवीन क्रेडीट कार्ड व रिवॉर्ड पॉईट देण्याचे अश्वासन दिले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडुन एसबीआय क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन एकुण तीन लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केली.

फिर्यादी यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, पुणे येथे धाव घेतली.

सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कदिर देशमुख यांना याबाबत माहिती घेतली. देशमुख यांनी मिळालेल्या माहीतीवरुन मर्चंट यांच्याशी पत्रव्यवहार करुन संबंधीत पेमेंट मर्चंटचे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. फिर्यादी यांच्या बॅंक खात्यातून झालेल्या फ्रॉड ट्रान्झेक्शन थांबविन्याबाबत कळविले. त्यानुसार तात्काळ फिर्यादी यांच्या अकाऊंटमधून गेलेले एकूण तीन लाख 66 हजार रुपयांपैकी 3 लाख 57 हजार 362 रुपये पुन्हा मिळविण्यात पोलीसांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.