Pune Crime News : पोलीस संरक्षण पुरवण्यासाठी 15 हजाराची लाच मागणारा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – जमिनीची हद्द कायम करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी तक्रारदारने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड याठिकाणी अर्ज केला होता. पोलीस बंदोबस्त पुरवण्यासाठी तक्रादाराकडे 15 हजार रूपयांची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.

सुरेश रमाकांत कदम (वय 34, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड कनिष्ठ लिपिक, वर्ग 3) असे कारवाई केलेल्या लिपिकाचे नाव आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी, तक्रारदाराने शिरूर येथील त्याची जमिनीची हद्द कायम करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड याठिकाणी अर्ज केला होता. पोलीस बंदोबस्त पुरवण्यासाठी लिपिक सुरेश कदम याने तक्रारदाराकडे 15 हजार रूपये एवढी लाच मागितली. याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्याच्यावर कारवाई केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.