Pune News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या टिप्पणी विरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

‘प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी होती. कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दखल केला आहे, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.’

रुपाली चाकणकर म्हणाल्या ‘गेल्या दोन वर्षापासून भाजप महाराष्ट्रातील एकतेला आणि परंपरेला नख लावायचं काम करत आहे. सातत्याने महाराष्ट्राची बदनामी कशी करता येईल, याकडे त्यांच जास्त लक्ष आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी अतिशय खालची राजकारणाची पातळी भाजपने गाठली आहे. प्रवीण दरेकर यांनी अतिशय अश्लिल असे विधान केलं. जाहीर सभेत बोलत असतांना महिलांना लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे. दरेकर यांनी यावर माफी मागने अपेक्षीत होते. मात्र मी या गोष्टीला ऐवढं महत्व देत नाही, असे दरेकर म्हणाले होते. त्यामुळे या प्रकरणी मी तक्रार दिली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळेल, असा विश्वास आहे.’

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशापुर्वी प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिप्पणी दरेकरांनी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.