Pune News : गणेश पेठेतील 80 वर्षे जुन्या लाकडी वाड्याला भीषण आग

एमपीसीन्यूज ; पुणे शहरातील गणेश पेठेत असलेल्या 70  ते 80 वर्षे जुन्या लाकडी वाड्याला आज, शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

गणेशपेठेत आज दुपारी पावणे चारच्या सुमारास एका लाकडी वाड्याला आग लागल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्यानुसार घटनास्थळी 4 पाण्याचे टँकर दाखल झाले होते.

जवानांनी तीन ते चार कुटुंबीयांना बाहेर काढले. त्यानंतर आगीत एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. जवानांनी पाण्याचा मारा करून तीन गॅस सिलेंडर बाहेर काढले.

आगीत जुना लाकडी वाडा जळाला आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळविले. ही कामगिरी प्रदिप खेडेकर, अतुल मोहिते, अजीम शेख, प्रशांत गायकर, शशी पवार, किशोर नवले, किसन गोगावले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.