Pune News : कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

अनिल शिंदे (वय 57) असे निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. दत्तनगर पोलीस चौकी येथे कर्तव्यावर असताना रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

अनिल शिंदे हे बुधवारी रात्री कर्तव्यावर होते. त्यांच्या या अशा अचानक जाण्याने पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अनिल शिंदे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. खडक पोलीस लाईन परिसरात ते राहण्यास होते. अनिल शिंदे हे मनमिळाऊ आणि कामात निष्णात अशी त्यांची ओळख होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.