Pune News : कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या एक हजार माता भगिनींना छोटीशी भेट – हेमंत आबा बागुल

एमपीसी न्यूज – नागपंचमी सणाच्या निमित्ताने सहकारनगर भागातील शाहू वसाहत, अण्णा भाऊ साठे वसाहत आणि डॉ. आंबेडकर वसाहत येथे एक हजारांहून अधिक माता-भगिनींना घरोघरी जाऊन साडी, बांगड्यांचा सेट, हळदकुंकू, टिकली व मेंदीचा कोन देण्याचा भावस्पर्शी कार्यक्रम आज पार पडला.

सहकारनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व आधार सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बागुल यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम भव्यतेने पार पडला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी श्रुतिका हेमंत बागुल तसेच दीपा बागुल उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे घरातील वडीलधार्‍या मंडळींच्या हस्ते घरातील सून अथवा मुलीस सौभाग्याचे हे लेणे दिले गेले.

कोरोना काळातील हालअपेष्टा व अडचणींच्या पार्श्वभूमीवर नागपंचमीनिमित्त मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे माता-भगिनींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी महिलांनी यापूर्वी नागपंचमी सणानिमित्त अशी भेट कोणीच दिली नाही, भावाच्या व मुलाच्या नात्याने हेमंत बागुल यांनी भेट दिली आहे अशा भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी आधार सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बागुल म्हणाले की, कोरोना परिस्थितीमुळे सर्वांच्याच हालअपेष्टांमध्ये भर पडली. आर्थिक ओढाताणही झाली. अशा परिस्थितीत उत्साहाने सण साजरे करणं व त्यासाठी खर्च करणे अनेकांना शक्य होत नाही हे लक्षात घेऊन या वस्तीतील माता-भगिनींच्या चेहर्‍यावर हसू फुलावे, त्यांना आनंद व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

नागपंचमी हा प्रामुख्याने महिलांचा सण मानला जातो. म्हणूनच या सणाच्या निमित्ताने एक हजार महिलांना साडी व अन्य वस्तू देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी त्रिंबक अवचिते अध्यक्ष जय हनुमान मित्र मंडळ, विनोद गायकवाड, अनिल साठे, सागर पुनवळे, सुनील अवचिते, विजय गायकवाड, सचिन अवचिते, भाऊ शिरसागर, दीपक गावडे, आनंद लोंढे, कुमार खटावकर, हबीब शेख, सुयोग धावडे, सचिन पवार, राम रणपिसे, रोहित शिंदे, राहुल जाधव, भरत तेलंग, तेजस बागुल, निखिल सोनवणे व असंख्य कार्यकर्ते व परिसरातील नागरिक कोरोना नियमावलींचे पालन करीत उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.