Pune News: सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अभय योजना

Pune News: Abhay Yojana in the second week of September or the first week of October टॅक्समधील गळती शोधून त्यातून 300 ते 400 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाचे संकट पुणे शहरात गंभीर झाले असतानाही महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अभय योजना लागू होणार असल्याचे संकेत हेमंत रासने यांनी दिले आहेत.

अभय योजनेमुळे 1 हजार कोटी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. टॅक्समधील गळती शोधून त्यातून 300 ते 400 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी 400 लोकांची लवकरच निवड करण्यात येणार आहे. या लोकांनी महापालिकेचे हित डोळ्यांसमोर ठेवून काम करणे अपेक्षित आहे.

एकही प्रॉपर्टी टॅक्स विना राहू नये, यासाठी रासने यांचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे शहरात अंदाजे अडीच ते 3 लाख प्रॉपर्टी आहेत. महापालिकेचे जास्तीत जास्त उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. राज्य शासनाला वारंवार मागणी करूनही मदत मिळाली नाही. केवळ 3 कोटी रुपये मदत करण्यात आली आहे. अशावेळी महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी हेमंत रासने यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.