Pune News : वाढत्या महागाईविरोधात अभिजीत बिचुकलेने मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र

एमपीसी न्यूज- बिग बॉस’ मुळे व आपल्या विधांनामुळे कायम चर्चेत असणारा (Pune News ) अभिजीत बिचुकलेने आता राज्यात वाढत चाललेल्या महागाईवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी त्याने खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे.त्यात त्याने म्हटले आहे की, राज्यांमध्ये वाढत चाललेली महागाई कमी करा .तसेच महिलांना ज्या पद्धतीने एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे ,तसेच घरातील गॅस सिलेंडरचे दर देखील 50 टक्क्याने कमी करा .
Dehu gaon : रिक्षाला धक्का लागला म्हणून तरुणाला बेदम मारहाण, तरुणाच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव
महिलांना फक्त बस सेवेत मुभा देऊन त्यांचे घर चालणार नाही तर गैस सिलिंडर मध्ये सूट दिल्याने त्यांना (Pune News ) काहीतरी मदत होईल असे,अभिजीत बिचुकलेने म्हटले आहे.