Pune News : तीन घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून पाहिजे असलेले आरोपी अटकेत 

एमपीसी न्यूज – तीन घरफोड्या करून फरार झालेला दोन वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. खंडणी विरोधी पथकाने बुधवारी (दि.21) हि कारवाई केली. 

आसिफ अय्युब शेख उर्फ काल्या ( वय 27, रा. हडपसर पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.‌

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी यांच्या विरोधात कोंढवा, बिबवेवाडी आणि लष्कर पोलीस ठाण्यात तीन घरफोडीचे गुन्हे दाखल असून दोन वर्षांपासून तो या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे. खंडणी विरोधी पथकाने बुधवारी (दि.21) त्याला हाडपसर परिसरातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला कोंढवा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.