Pune News : मास्क न वापरणाऱ्या 28 हजार पुणेकरांवर कारवाई; 1 कोटी 40 लाखांचा दंड वसूल

दरम्यान, काल गुरुवारी नांदेडचे काँग्रेस आमदारावर कारवाई करण्यात आली.

एमपीसीन्यूज : पुणे शहरात कोरोना प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी पुणे पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या व रस्त्यांवर थुंकणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार 2 ते 10 सप्टेंबर या कालावधीत 27 हजार 989 पुणेकरांवर कारवाई करून तब्बल 1  कोटी 39  लाख 94 हजार 500 रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नुकतीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत कोरोना कमी करण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर पुणेकरांवर कडक कारवाईसह प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार एक हजार व पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.

कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलीस कारवाई करीत आहेत. शहरात 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान 27 हजार 989 पुणेकरांवर मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यामध्ये 1  कोटी 39 लाख 94 हजार 500 रूपयाचा दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान, काल गुरुवारी नांदेडचे काँग्रेस आमदारावर कारवाई करण्यात आली.

त्यामुळे कोरोना काळात स्वतःची काळजी घ्यावी. मास्क न घालता घराबाहेर पडून नका; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.