Pune News : साडी सेंटरमध्ये गुटख्याचा अवैध साठा करणाऱ्या विरोधात कारवाई ; सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

विमलकुमार जैन याच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा या तंबाखुजन्य पदार्थांचा साडी सेंटरच्या दुकानात अवैध्यरित्या साठा करुन, विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे शाखेकडून कारवाई‌ करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 12)  नऱ्हे गावात करण्यात आली.

विमलकुमार सुखराज जैन (वय 45, रा. त्रिमुर्ती पॅलेस, फ्लॅट नं – 202, झील कॉलेज चौक, नऱ्हे गाव, पुणे) असे कारवाई केलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विमलकुमार जैन नऱ्हे येथील आपल्या साडी सेंटर दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विमल पान मसाला, आर. एम. डी. पान मसाला, रजनीगंधा पान मसाला व विविध प्रकारच्या तंबाखू व विदेशी सिगारेट याचा विक्रीकरिता साठा केल्याचे आढळून आले. त्याठिकाणी छापा टाकून रुपये 7 लाख 81 हजार 825 रुपये किंमतीचा गुटखा व विदेशी सिगारेट जप्त करण्यात आले. विमलकुमार जैन याच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहा. पोलीस आयुक्त, अभियोग, गुन्हे विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक, पूर्व विभाग, गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक विजय टिकोळे व कर्मचारी शिवाजी राहिगुडे, प्रफुल्ल साबळे, हेमा देबे, विशाल दळवी, योगेश माहिते, चेतन शिरोळकर, सचिन चंदन, अमित छडीदार यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.