Pune News : अत्यावश्यक सेवा नसतानाही सुरु असलेल्या सहा दुकानांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पुण्यात अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सुरु असलेल्या सहा दुकानांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी (दि.12) फरासखाना पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ भागातील अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सहा दुकाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग करत उघडी होती. भारतीय दंड विधान कलम 269, 188, साथरोग प्रतिबंधक कायदा कलम 3, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) अन्वये या सहाही दुकानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात अत्यावश्यक वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.