Pune News : पुण्यात लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या पुण्यातील चार हॉटेल्सवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरेगाव पार्क परिसरात हि कारवाई करण्यात आली.

कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल मर्फिज, हॉटेल टल्ली, हॉटेल द डेली आणि हॉटेल पब्लिक या चार हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देणे, फिजिकल डिस्टंन्सिंगचे नियम न पाळणे यासाठी हि कारवाई करण्यात आली.

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत या पार्श्वभूमीवर 12 मार्च रोजी पालिकेने लॉकडाऊन संदर्भात नियमाली जाहीर केली आहे. त्यानुसार, हॉटेल्सना रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, 10 ते 11 या कालावधीत फक्त होम डिलिव्हरीला परवानगी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.