Pune News : लॉकडाऊन काळात विनामास्क फिरणाऱ्या केकेआरच्या खेळाडूवर पुण्यात कारवाई

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन असतानाही चारचाकी गाडीने विनामास्क फिरणाऱ्या आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर टीमचा खेळाडू राहुल त्रिपाठी याच्यावर पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडीमशीन चौकात ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील खडीमशीन चौकात पोलीस नाकाबंदी दरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते.

यावेळी त्यांना एका चार चाकी गाडीत एक व्यक्ती विना मास्क असल्याचे दिसले. त्यांनी ही गाडी बाजूला घेऊन संबंधितावर कारवाई केली असता ही व्यक्ती प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी असल्याचे निष्पन्न झाले. राहुल त्रिपाठी हा खडकी च्या दिशेने जात असताना त्याने मास्क घातला नसल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.