Pune News : अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर फुलगाव येथे कारवाई

3 लाख 37 हजारांचा दंड वसूल ; अपर हवेली तहसीलची धडक कारवाई

एमपीसीन्यूज : अपर हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने वाघोली मंडळातील फुलगाव येथे अवैध गौणखनिज उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 3 लाख 37  हजार 120 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपार हवेलीचे परिविक्षाधीन तहसिलदार विजयकुमार चोबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे यांच्यासह तलाठी बाळासाहेब लाखे, श्री शिवले आणि सचिन मोरे यांनी सहभाग घेतला.

_MPC_DIR_MPU_II

या कारवाईमुळे अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, रॉयल्टी थकित असणाऱ्या परिसरातील क्रशर मशिन्सवर कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत तहसीलदार चोबे यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1