Pune news : मनपाच्या सर्व हॉस्पिटलमध्ये जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी कार्यवाही

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या नायडू, कमला नेहरू, दळवी, लायगुडे तसेच अन्य हॉस्पिटलमध्ये, राज्य शासनाची ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ उपलब्ध व्हावी़ यासाठी पुणे महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. योजनेकरिता हॉस्पिटल नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने’तून शेकडो कोटी रूपये खर्च करणाऱ्या पुणे महापालिकेने आपले जी हॉस्पिटल ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’करिता पात्र आहेत, अशा हॉस्पिटलची नावनोंदणी करण्यास प्रारंभ केला आहे. कोव्हिड -१९ च्या रूग्णांसाठी खास उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटल व बाणेर येथील डेडिकेटेट कोविड हॉस्पिटलची नोंदणी जनआरोग्य योजनेकरिता केलेली आहे.

सध्या येथे दाखल रूग्णांची या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे महापालिकेकडून जमा करण्यात येत आहेत. 1 ऑक्टोबर,2020 पासूनच्या रूग्णांवर झालेला खर्च महापालिकेला योजनेतून मिळण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्या जनआरोग्य योजनेचा लाभ पिंपरी-चिंचवड महापालिका, ससून हॉस्पिटलसह सरकारी हॉस्पिटल आणि शहरातील अन्य खाजगी हॉस्पिटल घेत आहेेेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.