Pune News : अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण; नाटकाचे प्रयोग रद्द

एमपीसी न्यूज – अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे पुढचे प्रयोग त्यांनी रद्द केले आहेत. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हंटले आहे की, ‘मागच्या रविवारी चिंचवडचा प्रयोग झाला तेव्हा मला कणकण वाटत होती. त्यामुळे मी बुधवारी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यात मी काठावर पास झालो आहे. तसा काठावर पास मी शाळेपासूनच आहे. पण हा काठ जरा डेंजर आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की काठावर जरी असलात तरीही सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये तुम्हाला जावं लागेल. म्हणून मी बुधवारपासून सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये आहे’.

_MPC_DIR_MPU_II

प्रशांत दामले पोस्टमध्ये पुढे असे म्हणाले, ‘उद्या दुपारचा बोरीवलीचा प्रयोग आणि परवा दुपारचा गडकरी रंगायतनचा प्रयोग हे रद्द करावे लागले आहेत. सध्या मी ठणठणीत आहे. पण डॉक्टर म्हणत आहेत की तुला सात दिवस विश्रांती घ्यावीच लागेल. सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट ही आहे की माझे सगळे सहकलाकार, बॅक स्टेजचे आर्टिस्ट हे ठणठणीत आहेत. मीच थोडासा काठावर आहे. काठावरचा मी थोडासा मागे येतो आणि परत काम सुरु करतो. मी काळजी घेतो तुम्हीही काळजी घ्या.’ असं दामले म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.