Pune News : अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी ते एका खासगी हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून ते रुग्णालयात दाखल झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डॉ. खेमनार यांनी कोरोनाच्या पहिल्या लसीचा डोस दोन ते तीन आठवड्यांपूर्वी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. खेमनार यांची आणि त्यांच्या मातोश्रींची करोना चाचणी करण्यात आली. यात डॉ. खेमनार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आईचा अहवाल निगेटिव्ह आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.