Pune News: अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वीकारला कार्यभार

Pune News: अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वीकारला कार्यभार Additional Commissioner Dr. Kunal Khemnar took the charge

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) या पदाचा पदभार शुक्रवारी डॉ. कुणाल खेमनार यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) रुबल अग्रवाल यांच्याकडून स्वीकारला.

याप्रसंगी राजेंद्र मुठे उपायुक्त (दक्षता),  अनिल मुळे उपायुक्त (सामान्य प्रशासन), सुनील इंदलकर (मुख्य समाज विकास)  व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुणे महापालिकेतील तिसरे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली आहे. पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना दोनच अतिरिक्त आयुक्त कार्यरत होते. त्यातच रुबल अग्रवाल यांच्याकडे पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा कार्यभार आहे. त्यामुळे तिसऱ्या आयुक्तांची रिक्त जागा भरण्याची मागणी केली जात होती. पुण्याचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती केल्यानंतर डॉ. खेमनार यांना हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले होते. पण, केवळ ७२ तासांत राज्य शासनाने त्यांची बदली करून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.