Pune News : ॲड. सुप्रिया बर्गे यांचा ‘राज्यस्तरीय प्रतिभासंपन्न वकील एक्सेलन्स पुरस्कारा’ने गौरव

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस कायदा विभागाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी  या संस्थेतर्फे राज्यस्तरीय भारतज्योती प्रतिभासंपन्न वकील एक्सेलन्स पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय गुणीजण गौरव महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ॲड. सुप्रिया बर्गे यांना सन्मानित करण्यात आले. कोविड प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. सन्मानचिन्ह, मानपत्र, गौरव पदक, मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

ॲड. सुप्रिया बर्गे या ‘बर्गे अँड बर्गे असोसिएट्स’च्या माध्यमातून बारामती येथे मोफत ‘कौटुंबिक सल्ला केंद्र चालवितात. या माध्यमातून त्यांनी अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच मोटार अपघात नुकसान भरपाई, शेत जमिनी, रस्ते, पाणी, वाद आदी दावे न्यायालयाच्या माध्यमातून कोणतीही फी न घेता निकाली काढून गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.

तसेच त्यांनी महिलांसाठी असंख्य विधायक उपक्रम राबविले आहेत. याशिवाय ‘यशश्री फाउंडेशन’ मार्फत जाणीव कायद्याची हा उपक्रमही त्या राबवित आहेत. कायद्या संदर्भातील चुका कशा पद्धतीने टाळता येतील. त्यातून पुढे होणारा त्रास कसा कमी करता येईल, याबाबतचे सखोल मार्गदर्शनही त्या सातत्याने करीत असतात. विविध शाळा, महाविद्यालये आणि खेडोपाडी जाऊन कायद्याबाबत विद्यार्थी आणि नागरिकांचे प्रबोधन करण्याचे कार्य त्या अव्याहतपणे करीत आहेत.

दिल्ली स्थित’ मानव संरक्षण समितीच्या’ मानव हक्क व संरक्षण संदर्भात नागरिकांचे प्रश्न सोडविणे, गुन्हेगाराला गुन्हे करण्यापासून परावृत्त करुन त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्याचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्नही त्या करीत आहेत. ॲड. सुप्रिया बर्गे यांच्या याच सेवाभावी कार्याची दखल घेऊन यापूर्वी अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांच्यातीने त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

अशा पुरस्कारांमुळे समाजासाठी निःस्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना ॲड. बर्गे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.