Pune News: कोरोनावर मात करून गणेश बिडकर पुन्हा नागरिकांच्या सेवेत

एमपीसी न्यूज – मागील 5 ते 6 महिन्यापासून पुणे शहरात अभूतपूर्व असे कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. या काळात नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी झोकून देऊन काम केले आहे.

15 हजार नागरिकांना रेशन वाटप, फवारणी करणे, आरोग्य सोयीसुविधा सक्षम करणे, कोरोनाच्या रुग्णांना बेडस उपलब्ध करून देणे, अशी अनेक महत्वपूर्ण कामे त्यांची सातत्याने सुरू आहेत. यातूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांशी संपर्क आल्याने गणेश बिडकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतरही बिडकर यांनी शांत न बसता नागरिकांना मदत करणे सुरूच ठेवले. आता ते या आजारातून बरे झाले आहेत. त्यांचे जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरूच आहे.

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या बातम्या ऐकण्यात आणि पाहण्यात येऊ लागल्या. मार्च महिना असा उजाडला, की कोरोना आणि क्वारंटाईन हे शब्द रोजच्या बोलण्यात येऊ लागले. लॉकडाऊनची घोषणा झाली आणि कोरोनाच्या भोषण संकटाची धग जाणवू लागली. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही तीव्र झाली. महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला पेशंट पुण्यात सापडला. गेली ३० वर्षे राजकीय, सामाजिक जीवनात असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आव्हान किती मोठे असणार आहे, याची जाणीव झाली. आरोग्यव्यवस्था सक्षम करायची, लोकांमध्ये भीती पसरू नये यासाठी जागृती करायची आणि कोरोनाचा पूर्ण एकजुटीने सामना करायचा, हा निर्धार झाला.

आव्हान पेलण्यासाठी ​आम्ही सज्ज झालो होतो. घरोघरी जाऊन सॅनिटायझेशन करून देण्याची​ ​सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम माझ्या भागात​ ​झाली, हे नमूद करायला हवे. ज्या इमारतोंमध्ये​ ​पेशंट आढळले, तेथेही तातडीने सॅनिटायझेशन​ ​करण्याची यंत्रणा आम्ही यशस्वीपणे बसविली.​ ​बस्त्यांमध्ये कोरोना पेशंट सापडल्यावर तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य​ ​करण्याकरिता कार्यकर्त्यांची साखळी उभारली​​. लॉकडाऊनला कष्टकरी वर्गाने खूप चांगली साथ​ ​दि​ली​, पण त्यांच्यापूढे रोटीचा प्रश्‍न मात्र ‘आ’ वासून​ ​उभा होता. ​१५​ हजार कुटुंबांना धान्य व शिधावाटप​ ​केले गेले. केंद्र सरकारतर्फे मोफत रेशन उपलब्ध​ ​करून देण्याच्या निर्णयाची चोख अंमलबजावणी​ ​करण्यासाठी सर्वतोपरी यंत्रणा उभारण्यात आली.

​माजी मुख्यमंत्री आणि विघानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सातत्याने मार्गदर्शन करीत होतेच. याच कालावधीत पुणे शहर भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे शहरभर महापौर मुरलीधर मोहोळ, पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आमदार सुनील कांबळे यांच्या समवेत शहरातील सर्व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे लक्ष दिले.​ ​आयसोलेशन सेंटर्स वाढविणे, टेस्टिंग क्षमता वाढविणे, महापालिकेचा निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणे या कामातही झोकून दिले.​

कोरोनाचा आमच्या भागात प्रवेश नक्की होणार, याचा मला अंदाज होताच. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे या संकटाला नियोजनपूर्वक तोंड देण्याची तयारी केली. लॉकडाउनमुळे सामाजिक वावरावर असलेली बंधने लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन केले. प्रत्येक कार्यकर्त्याकडे एका गल्लीची जबाबदारी सोपविली.
गणेश बिडकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.