Pune News : गाड्यांच्या हॉर्न नंतर आता ॲम्ब्युलन्स सायरनचा आवाज देखील बदलणार

एमपीसी न्यूज – गाड्यांना असणारे कर्णकर्कश हॉर्न बदलून त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसविले जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. त्यानंतर आता ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज देखील बदलणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे, पुण्यात आयोजित कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात घोषणा केली.

‘मी आता आदेश काढणार आहे की ॲम्ब्युलन्सवर जर्मन संगीतकाराने तयार केलेले संगीत किंवा धुन वापरण्यात यावी. ॲम्ब्युलन्सवर आताचा कर्कश हॉर्न नको,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचं काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी सांगितलं होतं. तुमच्या गाड्यांमध्ये आता कर्कश आवाजांच्या हॉर्नपेक्षा मधूर आणि सुरेल आशा भारतीय वाद्यांमध्ये आता तुमच्या गाड्यांचे हॉर्न वाजणार आहेत आणि यासंबंधित लवकरच कायदा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं होतं. त्यानंतर आता ॲम्ब्युलन्स सायरनचा आवाज देखील बदलणार आहे.

तसेच, ‘मी तीन ते चार महिन्यांत ऑर्डर काढतोय की सर्व प्रकारच्या कारसाठी अगदी मर्सिडीज सुद्धा पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल अशी इंजिन बसवावी लागतील. दुचाकीही इथेनॉलवर चालवता येतील,’ असं गडकरी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.