Pune News : पेन्शनवाढीच्या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाचे पीएफ कार्यालयासमोर धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 1995 पेंशन योजनेतील पेन्शन वाढ होण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाने  केली आहे. यासाठी संघाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पीएफ विभागीय आयुक्त अरुण कुमार यांना मागण्यांचे निवेदनदेण्यात आले. 

यावेळी संघाचे  चिटणीस जालिंदर कांबळे, अर्जुन चव्हाण, उमेश विस्वाद, विवेक ठकार, अजेंद्र जोशी, वासंती तुम्मा, विजयालक्ष्मी येमुल आदी उपस्थित होते. समितीचा अहवाल येईपर्यंत किमान पाच हजार महागाई भत्ता देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

  या आहेत भारतीय मजदूर संघाच्या महत्वपूर्ण मागण्या  

– पेन्शन वाढ व सुधारणा याकरिता त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात यावी.

– अवहाल प्राप्त होईपर्यंत किमान पाच हजार रुपये महागाई भत्ता मिळावा.

_MPC_DIR_MPU_II

– सर्व पेन्शन योजनांत सरकारचे अंशदान सारखे असावे.

– सर्व कामगारांना त्यांच्या शेवटचा वेतनाच्या 50 टक्के रक्कम सेवानिवृत्त नंतर मिळावी.

– सरकारी कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजना लागू  करण्यात यावी.

– बॅंक, विमा अन्य कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनांचे  वेळोवेळी पुनः निर्धारण करण्यात यावे.

– सामाजीक सुरक्षा मुलभुत अधिकारात समाविष्ट करून पेन्शन योजना करण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.