Pune News: वारजे-माळवाडी परिसरात मंदिरे उघडण्यासाठी भर पावसात आंदोलन

एमपीसी न्यूज – संपूर्ण देशातील प्रमुख धार्मिकस्थळे उघडण्यासाठी केंद्र सरकारने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरात सगळीकडे मंदिरे नियमांचे पालन करुन सुरू देखील झाली आहेत. याला अपवाद असलेली महाराष्ट्र राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी  आमदार भीमराव तापकीर, पुणे शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक व खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे यांच्या नेतृत्वाखाली वारजे माळवाडी परिसरातील एक प्रमुख देवस्थान पावश्या गणपती मंदीर येथे भर पावसात घंटानाद आंदोलन करण्यात आले. 
या आंदोलनात अरूण दांगट, अरविंद जोशी यांच्यासह अमजद अन्सारी, आनंद देशपांडे, विकास गंपले, अशोक दहिरे, रेणुका मोरे, वर्षा पवार, सुप्रिया निबांळकर, वंदना काकडे, परशुराम पुजारी, व्यंकटेश दांगट, आशा मोरे, यल्लु हूसकोटी, वनिता कांबळे यांच्यासह हातात निदर्शनाचे फलक घेऊन घोषणाबाजी करीत सर्वधर्मीय युवक , महिला जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 महिलांनी पारंपरिक नऊवारी परिधान करून भर पावसात मुलाबाळांसह या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनाचे संयोजन स्वीकृत सभासद सचिन दशरथ दांगट यांनी केले होते.

अतुलनगर हायवे सर्व्हीस रस्ता चौकाजवळील दत्तमंदिर वारजे माळवाडी येथे घंटानाद आंदोलन केले गेले. या प्रसंगी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घंटानाद आंदोलनात सहभाग दर्शविला. यावेळी नाना काटे पाटील, शिल्पा महाजनी, बंडोपंत चिंतावर, रामभाऊ मारणे, माधव देशपांडे, शशिकांत धारवाडकर, सचिन वांजळे, श्रीपाद जोशी, विश्वनाथ तारु, मुरलीधर भोसले, मंदार रेडे उपस्थित होते.
घंटानाद आंदोलनांचे आयोजन माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी केले होते. अशोक ऊनकुले यांनी उपस्थित नागरीकांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.