Pune News: कृषी महाविद्यालय चौकातील उड्डाणपूल पाडणार नाही – आयुक्त विक्रम कुमार

एमपीसी न्यूज – महामेट्रोकडून पूल न पाडता शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्गिका उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे महात्मा फुले कृषी महाविद्यालयासमोरील उड्डाणपूल पाडण्यात येणार नाही, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

येत्या आठवड्यात महामेट्रो संदर्भात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत उड्डाणपुला संदर्भात अंतिम निर्णय होणार आहे.

दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) सादर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. त्यासाठी विद्यापीठ चौकातील पूल पाडण्याचे काम गतीने करण्यात आले.

दुसऱ्या टप्प्यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन होते. परंतु महामेट्रोच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सद्यस्थितीतील उड्डाणपुलाला धक्का न लावता प्रस्तावित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची मार्गिका उभारू शकतो. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडण्याचे रद्द झाले असल्याचे आयुक्त कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III