Pune News : काहीही केलं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे दिल्ली पुरते मर्यादित राहणार नाही असे शरद पवार म्हटले आहेत. मात्र काहीही झालं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकारांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा तयार केला आहे. त्या कायद्याचा फायदा सर्व शेतकर्‍यांना होणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होते तेच असून फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली. जी अगोदर नव्हती.

प्रश्न फक्त एमएसपीचा होता. तो केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काहीच अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही. फक्त कायद्यात बदल केला जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

देशात केलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यामध्ये शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहे. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी सर्वांना शुभेच्छा असून लोकशाही आहे. त्यामध्ये कोणीही भेट घेऊ शकते. ते भेट घेत असतील तर त्यांच स्वागतच आहे, असेही त्यांनी सांगितले.

हैद्राबाद निवडणुकी नंतर ‘मिशन मुंबई’ अशी चर्चा झाली आहे. हिमालयात कधी जाणार हे देखील सोशल माध्यमावर चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.