Pune news: पुणेकरांसाठी धोक्याची घंटा; डिसेंबर, जानेवारीत कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा अंदाज

एमपीसी न्यूज – मागील आठ दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पुण्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत असले तरी, डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची आकडेवारी वाढणार असल्याचे केंद्रीय पथकाने स्पष्ट केले. त्यामुळे वर्षाअखेर आणि नव्या वर्षाची सुरवात पुणेकरांसाठी काळजीची राहणार असल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक पुण्यात आले आहे. जम्बो कोविड सेंटरसह बाधित क्षेत्राची पाहणी त्यांनी केली आहे. कोरोनाची सद्यस्थिती, त्याचे परिणाम आणि वाढीची चिन्हे या अनुषंगाने महापालिकेला काही सूचना ही केल्या आहेत.

पुढील दीड महिना म्हणजे, नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल, असे पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डिसेंबर आणि जानेवारीत मात्र संसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

_MPC_DIR_MPU_II

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवावा. आरोग्य खात्यातील मनुष्यबळाचा योग्य वापर करावा. ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्यांची तपासणी करावी अशा सूचना पथकाने केल्या आहेत.

पालिकेची सर्वतोपरी तयारी – डॉ. संजय वावरे

महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे म्हणाले, केंद्रीय पथक 7 तारखेपासून शहरात होते. दोघांचे पथक आहे. त्यांनी कॅनटेन्मेंट झोन, हॉस्पिटलची पाहणी केली आहे. काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. चालू असलेल्या जनरल सर्व्हे बरोबर को-मोर्बीड सर्व्हे जास्तीत जास्त करावा. त्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे.

लक्षणे दिसताच त्यांची तपासणी करावी. कदाचित डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत दुसरी लाट येवू शकतो. रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढली तर पालिकेने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची तयारी ठेवणे गरजेचे आहे. तशा सूचना केल्या आहेत. त्यादृष्टीकोनातून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची पुरेपूर तयारी आहे. दुसरी लाट आली तरी पालिकेचे सर्वतोपरी तयारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.