Pune News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे इशान कोविड सेंटरला 30 बेडस् सुपूर्त

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे नऱ्हे येथील इशान कोविड सेंटरला 30 बेडस् सुपूर्त करण्यात आले आहेत. वाढता कोरोना संसर्ग आणि बेडचा तुटवडा लक्षात घेता पुण्यातील सर्व शाखा एकत्र येऊन रविवारी (दि.09) मे रोजी हे बेडस् सोपवले.

यावेळी आमदार भीमराव अण्णा तापकीर, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, गणेश सातपुते, किरण बारटक्के, सागर भूमकर, शिवाजी मते तसेच, महासंघाच्या सर्व शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘कठीण प्रसंगी नेहमी ब्राह्मण समाज तत्परतेने लोकांसाठी धावून आला. ब्राह्मण समाजाचे या समाजपयोगी कार्यात मोठे योगदान आहे,’ असे आमदार तापकीर यावेळी म्हणाले. डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले, ‘कोरोनाच्या संकट काळात महासंघाने भारतात अनेक ठिकाणी समाजातील अनेक घटकांना शिधा, वैद्यकीय मदत, रोजगार याबाबत मदत केली.’ मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी महासंघाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केतकी कुलकर्णी यांनी केले तर, प्रास्ताविक मंदार रेडे यांनी केले. विकास अभ्यंकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.