Pune News : सर्व महापालिका शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढणार : खा.संजय राऊत

0

एमपीसी न्यूज : राज्यातील पुण्यासह सर्व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढतील, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

पुण्यातील पुलाची वाडी येथील शिवसेना भवनात पदाधिकारी आणि कार्यकर्ते भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार राऊत म्हणाले, आगामी महापालिका निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. काँग्रेसलाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या शहरात ज्या पक्षाची ताकद त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल.

_MPC_DIR_MPU_II

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असल्याने त्यांना जागा वाटपात जास्त संधी मिळेल. पण, एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच राष्ट्रहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत असेल तर ती योग्यच असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नेत्यांकडं कोकेन सापडलं याची बातमी मीडियात आली नाही. मुंबईत कोणाकडे काही ग्रॅम सापडलं तर नॅशनल न्यूज होते.

डॉ. अब्दुल कलाम यांच्या वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटलांचे हसं झाले आहे, अशी खिल्ली देखील त्यांनी उडवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.