Pune News : पुणे महापालिकेकडील लसीचा सर्व स्टॉक संपला

एमपीसी न्यूज – येत्या 1 तारखेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार असली तरी सध्या लसींचा पुरवठा पाहता मोठा गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. शहराला मागील दोन दिवसांपासून लसच उपलब्ध झालेली नसल्याने महापालिकेकडील सर्व स्टॉक संपला आहे. त्यामुळे 172 लसीकरण केंद्रांपैकी निम्म्याच रुग्णालयांत ज्याठिकाणी लस शिल्लक होती, तेथेच किरकोळ संख्येने लसीकरण झाले.

शहरात पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर्स, दुुसऱ्या मध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिक व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त, 4 था टप्प्यात 45 वर्षे वयावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मागील सव्वातीन महिन्यांत 7 लाख 50 हजार लसीकरण झाले आहे.

यामध्ये लसींचे दोन डोस घेतलेल्यांचाही समावेश आहे. यासंदर्भात महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी मागील दोन दिवसांत लसींचा पुरवठा झाला नसल्याचे मान्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.