Pune News : मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या; शिवसेनेची मागणी

एमपीसीन्यूज : शहर आणि जिल्ह्यातील मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स आणि सभागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, माजी नगरसेवक प्रशांत बधे, योगेश मोकाटे, शंकर बेलदरे, सुनिल महाजन तसेच असोसिएशनचे सुरेश शर्मा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहर व जिल्ह्यामध्ये जवळपास 500 कार्यालय, हॉल, सभागृहे आहेत. या व्यवसायावर बराडी, वाढपी, आचारी, वाजंत्री, फुलचाले, सजावटकार, रोजंदारी कामगार, पारंपारिक वादक असे हजारो व्यावसायिक व कामगारांचा रोजगार अवलंबून आहे. या लोकांचे हातावरचे पोट असल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सध्या फक्त 100 लोकांच्या उपस्थितीचा नियम पाळला जात आहो.त्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय जाहीर करा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.