Pune News : अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारली पोलीस आयुक्तपदाची सूत्रे

एमपीसी न्यूज – पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज (रविवारी) नव्या पदाची सूत्रे हाती घेतली. मावळते पोलीस आयुक्त  डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडून गुप्ता यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.

डॉ. वेंकटेशम यांनी शनिवारी (दि.19) पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी केलेल्या कामाची दिली. दरम्यान, रविवारी राज्याचे गृहमंत्री पुण्यात दाखल झाले. त्याचवेळी गुप्ता यांनी काही मोजक्याच पोलिस अधिकाऱ्यांच्या उपास्थितीत पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतली.

पुणे पोलीस आयुक्तपदावरील नियुक्तीबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्यासाठी गुप्ता यांच्यासह अनेक मोठी नावे चर्चेत होती. त्यानुसार गुरुवारी रात्री राज्याच्या गृह विभागातर्फे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांच्या नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त बदलीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. डॉ. वेंकटेशम यांची अप्पर पोलिस महासंचालकपदी (विशेष अभियान) नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.