Pune News : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार दिल्याच्या राग मनात ठेवून दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.25) आंबेगाव येथील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी भुंजग हेंद्रे (वय 27, रा. आंबेगाव-खुर्द, पुणे ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा भावासह आंबेगाव-खुर्द येथील सार्वजनिक रोडवरून मोटार सायकलवरुन त्यांच्या फेब्रिकेशन दुकानात जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांची मोटार सायकल अडवली.

फिर्यादी यांचे मेहुणे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याचा राग मनात धरुन ‘आमच्या विरोधात तक्रार देता काय’ असे म्हणत फिर्यादी व राजुभाऊ या दोघांना वार करून त्यांना गंभीर जखमी करूत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.