Pune News : सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा – प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी पुढाकार घेतला होता अशी धक्कादायक माहिती जाहीर केली. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाचा अधिकार कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. या सर्वांना मोक्का लावून अटक झालीच पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 
प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटर वर एक व्हिडिओ शेअर करत हि मागणी केली आहे. या व्हिडिओ मध्ये ते असे म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी पुढाकार घेतला होता अशी धक्कादायक माहिती जाहीर केली. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाचा अधिकार कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. या सर्वांना मोक्का लावून अटक झालीच पाहिजे’

 

‘गृहमंत्र्यांनी या लोकांची नावं जाहीर करावी असं त्यांना आम्ही आवाहन करतो. अन्यथा त्यांच्या ऑफिस समोर आम्ही धरणं आंदोलन करून त्यांना नावं जाहीर करायला भाग पाडू’ असे त्यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले आहेत, असे मी म्हटल्याचे एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. मात्र, अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या तोंडी हे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने टाकले असल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.